Subscribe Us

header ads

मोदी जर इतके लोकप्रिय आहेत तर मग त्यांना सगळ्या ठिकाणी स्वतःचा फोटो का हवा?? --- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

बीड स्पीड न्यूज 

मुंबई_करोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसवर उत्सव साजरा करणाऱ्या भाजपा नेत्यांवर सडकून टीका केलीय. मुळात लस खरेदी करायला केंद्र सरकारने उशीर लावला. इतर देशांनी लसीची ऑर्डर देऊन बुक केल्या होत्या. आपण सगळ्यात शेवटी लस खरेदी केली. ऑर्डर देण्यात उशीर झाल्यानं हा गोंधळ झाला. अजूनही बाहेरच्या बऱ्याचशा लसी आलेल्या नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, १०० कोटी लस डोस दिले म्हणून कार्यक्रम पार पडला. २७८ दिवसांनी आपण १०० कोटी डोस दिले. हे काम डॉक्टर आणि नर्सेस यांचं आहे आणि त्यासाठी त्यांचं कौतुक आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातोय. मोदींचा वाढदिवस असो किंवा इतर सर्व गोष्टींचा इव्हेंट केला जातो. आतापर्यंत केवळ ३० टक्के नागरिकांना लस पोहचली आहे. अजूनही आपल्यातील कित्येक नागरिकांना २ डोस मिळाले नाहीत.

केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. 

आपल्या देशाचा नंबर १४४ वा लागतो. चीननं ११० कोटी लोकांना दोन डोस दिले आहेत. अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशात बूस्टर डोस द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजूनही आपली जनता पूर्णपणे सुरक्षित झालेली नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, पुढील वर्षभर हे लसीकरण सुरू राहणार असं दिसतंय. पहिल्या दिवसापासून केंद्राने लस विकत घ्यायला पाहिजे होती. मात्र, तसे न करता मोदींनी खासगी कंपन्यांना लस विकत घ्यायला परवानगी दिली. यामुळे लसीचे दर वाढवून ठेवले. यामागे मोदी सरकार आहे. याची चौकशी झाली पाहिजे. सगळ्या ठिकाणी मोदींना आपला फोटो हवा असतो. इतकी जाहिरात कशासाठी? मोदी तुम्ही इतके लोकप्रिय आहेत तर आणखी जाहिरातबाजी कशाला? लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो कशाला? लसीकरण ही जबाबदारी आहे इव्हेंट नव्हे. तिसरा डोस देणार का? लहान मुलांना डोस देणार का? बाहेरील देशातून लस घेतली जाणार का? या सगळ्याबाबत मोदींनी भूमिका स्पष्ट करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा