Subscribe Us

header ads

मांजरसुंबा येथे दोन ट्रक गुटखा पकडला; कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ

 बीड स्पीड न्यूज

बीड प्रतिनिधी_कर्नाटकहून बीडकडे दोन ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती डीवायएसपी पंकजकुमार यांना झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या. या गाड्यांमध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई आज दुपारी मांजरसुंबा येथे करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.कर्नाटक राज्यातून बीडकडे दोन ट्रक भरुन गुटखा येत असल्याची माहिती मिळताच या ट्रक मांजरसुंबा मार्गावरून जात होत्या. या दोन्ही गाड्या डीवायएसपी पंकजकुमार, नेकनूर ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख मुस्तफा, दीपक खांडेकर, सय्यद अब्दुल, मनोहर अनवणे, राऊत यांनी ताब्यात घेतल्या. या दोन्ही गाड्यात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला दोन्ही ट्रक गुटख्यासह पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या गाड्या कर्नाटकहून बीडकडे येत होत्या. त्या ट्रक कोणाकडे येत होत्या, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या कारवाईने गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा