Subscribe Us

header ads

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

गेवराई प्रतिनिधी_एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा येथे घडली आहे. दरम्यान सदरील मयत तरुणाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली, हे मात्र समजू शकले नाही. दिलीप भगवान भोसले (वय 23 वर्ष) रा.बंगालीपिंपळा ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा येथील रहिवासी असलेल्या दिलीप भोसले याने मंगळवार दि.12 रोजी विष प्राशन केले होते. यानंतर त्याला उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज बुधवार रोजी सकाळी उपचारादरम्यान दिलीप भोसले याचा मृत्यू झाला. दरम्यान मयत दिलीप याने कोणत्या कारणाने विष प्राशन केले हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दिलीपच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा