Subscribe Us

header ads

सदगुरु विश्वनाथबाबा पुण्यतिथी साजरी

बीड स्पीड न्यूज 

वृत्तसंकलनः आत्माराम ढेकळे,पुणे.

पुणेः- येथील गंगाधाम परिसरात असलेल्या "ॐश्री साई नरेंद्र " 'ॐश्री साई विश्वनाथबाबा ' स्थापित मंदिरात सदगुरुश्री विश्वनाथबाबा यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली.गंगाधाम परिसरात वास्तव्यास असलेले साईराज उर्फ  श्री संतोषजी बाबा(रांका) व सौ.नीताभाभी (रांका) यांनी सदगुरु श्री विश्वनाथबाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे आयोजन विविध कार्यक्रम आयोजित करुन  करुन करण्यात आले. प्रामुख्याने याप्रसंगी  बाबांचे मेव्हणे सोयबमामा यांचीही  उपस्थिती होती.या पुण्यतिथी कार्यक्रमात पिंपरी चिंचवड येथील "साई विश्व भजनी मंडळ"यांनी साईबाबा व विश्वनाथबाबा यांच्यावरील रचित भक्तीगीते भजन स्वरुपात मनमोहक आवाजात सादर केली.तर भजनी मंडळीनी सादर केलेल्या भजनाच्या 

तालावर भाविक व लहान मुलांनी नृत्य सादर केले.त्यांचे सर्वांनी कौतुक केले.मंदिरातील महाआरतीचा सर्वांनी लाभ घेतला. भाविका समवेत श्री विश्वनाथबाबा यांच्या प्रतिमेची पालखीतुन मिरवणुक काढण्यात आली.भाविकांनी जयघोष करीत पालखीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.शेवटी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमास पुणे,पिंपरी चिंचवड,निगडी तसेच बाहेर गावाहुन भाविक जनांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा