Subscribe Us

header ads

शेख सिराज यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार

बीड स्पीड न्यूज 

बीड दि.13 (प्रतिनिधी): राष्ट्रीय काव्यांगण लेखनीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक शैक्षाणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित  करण्यात येते.  सन 2021 यावर्षी बीड जिल्हयातील अंबाजोगाई तालुकयातील डिघोळअंबा येथील विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक शेख सिराज यांना राष्ट्रीय स्तरावरील ्रआदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.सदर पुरस्कारांसाठी ऑनलाईन वेबसाईट द्वारे माहिती सादर करण्यात आली. दि.10 ऑक्टोबर 2021 रोजी गुगल मीटद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध कवी डॉ. सुनील पवार, राष्ट्रीय सल्लागार डॉ.निरज आत्राम रास्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक राजु पाडेकर, उपाध्यक्षा सौ.प्रांजली काळबेंडे, महासचिव प्रा.सुहानंद ढोक आदी मान्यवर उपस्थित होते.अंबाजोगाई तालुक्यातील जि.प. हायस्कूल डिघोळ्आंबा प्रशालेतील विविध पुरस्कारप्राप्त पदवीधर शिक्षक शेख सिराज यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक  पुरस्कार 2021 ऑनलाईनद्वारे व गुगल मीटद्वारे  देण्यात आला. शेख सिराज यांचा गौरवपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  शेख सिराज यांना यापूर्वी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले फेलोशिप दिल्ली, राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप अवार्ड मुंबई, समाजरत्न पुरस्कार, एकता गौरव पुरस्कार, साहित्य भूषण पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेख सिराज हे शिक्षक सन्मान अभियान संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रसिद्धी प्रमुख आहेत. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा