Subscribe Us

header ads

अल्पसंख्याक संघटना व पेन्शनरच्या वतीने सिईओचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 

बीड दि.13 (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी व पेन्शनरचे मासीक वेतन सीएमपी प्रमाणीव्दारे संघटनेच्या मागणीनुसार विहित कालावधीमध्ये केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व मुख्य लेखा व वित्त अधिकारी जटाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आणि शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकणी आणि लेखााधिकारी जव्हेरी यांची उपस्थिती होती.सामान्य प्रशासन विभागाची माहे सप्टेबर 2021 ची पेन्शन सीएमपी प्रमाणीव्दारे जमा करण्यात आली. यामुळे पेन्शनर संघटना व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख वजीर, संघटनेचे पदाधिकारी अविनाश शेवाळे, सिताराम मुळे, शेवाळे, वैजनाथ पिंगळे, वाहन चालक वडमारे, यनकुळे, आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आले.यापुढे जिल्हा परिषदेचे तृतीय व चतुर्थ कर्मचार्‍यांचे मासीक वेतन व पेन्शन सी.एम.पी. प्रणालीव्दारे महिना संपल्यानंतर 5 तारखेपर्यंत होणार आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा