Subscribe Us

header ads

बदनापुर.तीन -चार महीन्यापासून वार्ड क्रमाक एक ते सतरा परिसरात पिण्याच्या व वापरण्याच्या पाणी न आल्याने बदनापुर नगरपंचायत येथे वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

 बीड स्पीड न्यूज 

 बदनापुर प्रतिनिधी हाफीज हारून पठाण

बदनापूर_आज दिनाक १३ ऑक्टोबर बुधवार रोजी बदनापुर  नगरपंचायत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले कि की शहराला न. प. च्यावतीने आठ दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही महीन्यापासुन वार्ड क्रमाक एक ते सतरा हया परीसरात पाणी येईना  बाहेरून पाणी गाड्या बोलवुन विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. न.प.च्या पाणी पुरवठा विभागावर वंचित बहुजन आघाडी  धडक देत नळाला पाणी देण्याची मागणीकेली.गेली अनेक महीन्यापासुन परीसरात बंद असलेल्या  बदनापुरच्या पाणी प्रश्‍नावर जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष द्यावे शहराचा पाणी प्रश्न किती गंभीर असेल याची कल्पना त्यांना आलीच पाहीजे. तेव्हा त्यांनी याबाबत त्यांच्या स्तरावरून हा प्रश्न मार्गी लावावा
 नसता आमचे प्रश्न दोन ते तीन दिवसात मार्गी न लावल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चौथ्या दिवशी नगरपंचायत पाणी पुरवठा विभागावर परिसरातील परिसरातील महिला  सोबत हंडे घेऊन  हंडे बजाव आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. तसेच बदनापुर शहर कांग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अलिम हरून शेख यांनी आज दि 13,10,2021बुधवार  रोजी वंचित बहुजन आघाडी मध्ये   प्रवेश केले या वेळी  रविराज वाहुळे तालुकाअध्यक्ष . ..शहर अध्यक्ष अतिक अत्तार,शाहरुख शेख,.सुनिल दाभाडे,.अकिल पठान. ,सुमित जगताप., विकास रगडे,सैय्यद अजिम ,अमोल मगरे . व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा