Subscribe Us

header ads

रिक्षाच्या धडकेत ऊसतोड मजुर जागीच ठार

 बीड स्पीड न्यूज

गेवराई_तालुक्यातील कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगांव येथे अँपे रिक्षाने एकास जोराची धडक देऊन चिरडले ही घटना मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. जखमीस जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संबधित रिक्षा चालक फरार झाला आहे.
या अपघातानंतर चकलांबा पोलिस चार तासाने घटनास्थळी पोहचले. त्यामुळे नागरिक आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.गेवराई तालुक्यातील कोळगांव जवळील भिल्लवस्तीवरील उसतोड कामगार रामलिंग शहादेव बर्डे (वय ४५) वर्ष यास भिल्लवस्ती कडे जाताना अँपे रिक्षा क्रमांक एम एच १६ ए जी ८४४१ यांनी जोराची धडक देवुन जागीच चिरडलेची घटना दि.१२ आँक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता घडली हि घटना कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगांव शिवारात घडली. अपघातात मरण पावलेल्या व्यक्ती हा घरी पायी जात आसताना पाठीमागून रिक्षाने जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला, संबधित रिक्षा चालक फरार झाला आहे. या घटने नंतर तब्बल चकलांबा पोलिस चार तासाने घटनास्थळी पोहचले. पोलिसांना फोन करुनही चकलंबा पोलिस घटास्थळी उशीरा पोहचले. नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेल्या नंतर पोलिस आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. अपघातात मृत्यू पावलेल्या उसतोड कामगाराच्या पश्चात चार मुले व पत्नी  असे परिवार आहे.शोकाकुल वातावरणात भिल्लवस्ती अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा