Subscribe Us

header ads

बीड; आठ लाख ९९ हजार शेतकऱ्यांना ४६२ कोटी २४ लाख

बीड स्पीड न्यूज 

बीड_अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाला ४६२ कोटी २४ लाख रुपयांच्या मदतीचा अहवाल शासनाला पाठविला आहे. यामध्ये सहा लाख ५६ हजार ८४६ हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. सर्वाधिक नुकसान गेवराई तालुक्यात झाले असून या तालुक्यातील एक लाख ४८ हजारांवर शेतकऱ्यांसाठी ६८ कोटी ३९ लाख रुपयांचा समावेश आहे. ता. १२ ऑक्टोबरला प्रशासनाने सव्वा नऊ लाख शेतकऱ्यांचे सहा लाख ७८ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यासाठी ४८० कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला दिला होता. आता शुक्रवारी (ता. १५) सुधारीत व अंतिम अहवाल पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यात बीड जिल्ह्यात शेती पिकांसह बांधकाम, महावितरण, जिल्हा परिषद आदी विभागांच्या इमारती, रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. याचाही ताळेबंद व नुकसानीचा अंदाज संबंधित विभागाने तयार केला आहे. मात्र, प्राथमिकता शेतकऱ्यांना अगोदर मिळावी, अशी असल्याने आता मदतीच्या रकमेचा अंतिम व सुधारीत अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.यामध्ये आठ लाख ९८ हजार ८६१ शेतकऱ्यांचे सहा लाख ५६ हजार ८४६ हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यांच्यासाठी ४६२ कोटी २४ लाख १७ हजार रुपयांच्या भरपाईची नोंद आहे.जिरायतीसाठी४३१ कोटी ७६ लाखबागायतीसाठी२६ कोटी ८२ लाखबागायतीसाठी२६ कोटी ८२ लाखगेवराईत सर्वाधिक एक लाख ४८ हजार शेतकऱ्यांसाठी ६८ कोटी ३९ लाखजमीननिहायनुकसान व रक्कमजिरायती : सहा लाख ३४ हजार ९४८ हेक्टर : ४३१ कोटी ७६ लाख ४६ हजार.बागायती : १९ हजार ८६८ हेक्टर : २६ कोटी ८२ लाख २० हजार.फळपिके : दोन हजार ३० हेक्टर : तीन कोटी ६५ लाख ५० हजार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा