बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
वाकनाथपुर प्रतिनिधी_कोविड १९ या विषाणू मुळे भारतातील सर्व शाळा कॉलेज बंद होते सर्व विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत होते. आणि सर्व शिक्षक ऑनलाईन अभ्यास घेत होते. आज ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद आहेत परंतु कोरोणा काळात ही विद्यार्थ्या पर्यंत त्यांचा पोषक आहार सरकारने पोहचवण्याचे काम केले आणि आज ही करत आहेत.आज दिनांक १८ ऑक्टोंबर वार सोमवार रोजी वाकनाथपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पोषक आहार वाटप करण्यात आला. त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नविद सर, गावडे सर, कलीम सर,बीड स्पीड चे प्रतिनिधी नवनाथ गोरे, शेख सत्तार, आदी ची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या