Subscribe Us

header ads

वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

 बीड स्पीड न्यूज

गेवराई प्रतिनिधी_शेतातून घराकडे परतणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेचा अंगावर वीज पडल्याने यामध्ये सदरील महिलेचा मृत्यू झाला. हि दुर्देवी घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. मिनाबाई मच्छिंद्र लोणकर (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे.शनिवारी सायंकाळी गेवराई तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दरम्यान निपाणी जवळका येथे दिवसभर काम करून मिनाबाई मच्छिंद्र लोणकर (वय 45) या घराकडे परत येत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. नातेवाईकांनी निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी मिनाबाई यांना नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. घटनेची माहित मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पो.कॉ. अमोल खटाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा