Subscribe Us

header ads

बर्दापूर जवळ अपघात शिक्षकाचा जागीच मृत्यू; दोन जण जखमी


अंबाजोगाई_ अंबाजोगाई लातूर रोडवर अपघाताच्या घटनेत वाढ होत असून दर दोन चार  दिवसाला या रोडवर अपघात घडत आहेत. बर्दापूर पाटी जवळ कार  पिकअप टेम्पो  दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दिनांक 9 ऑक्टोबरला रात्री 11: 30 सुमारास घडला. अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव  भुनम्मा सायन्ना शिरपे (वय 39) असे असून ते घाटनांदूर येथील शाळेत शिक्षक होते.याबाबत प्राप्त माहिती अशी की, शनिवारी रात्री भुनम्मा शिरपे हे दुचाकीवर (एमएच 44 एल 7982) लातूरहून अंबाजोगाईला येत होते. बर्दापूर पाटीच्या पुढे आले असता डिझायर कार (एमएच 20 बीवाय 9787) आणि पोल्ट्रीच्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पो सोबत त्यांच्या दुचाकीचा तिहेरी अपघात झाला.या अपघातात भुनम्मा शिरपे यांचा जागीच मृत्यू झाला तर रोहित कुचेकर (रा. परळी वेस) आणि डिझायरचा चालक अशोक कदम (वय 38, रा. आपेगाव) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. 208 रुग्णवाहिकेचे डॉ. सचिन कस्तुरे, चालक पुरुषोत्तम ओव्हळ यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना ‘स्वाराती’ येथे  उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, बर्दापूर पोलिसांनी तातडीने वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला.अंबाजोगाई लातूर रोडचे काम राष्ट्रीय महामार्गातंर्गत झाले असून हा महामार्ग नव्यानेच केला आहे. रोड चांगला असल्याने अनेक जण भरधाव वेगात वाहनं चालवितात आणि काहीवेळा वाहनावरील नियंत्रण सुटते, त्यामुळे अपघाताच्या घटना या रोडवर घडत आहेत. त्यामुळे ‌वाहनांचा वेग नियंत्रित असावा आणि दुचाकीस्वारांनी प्रवास करताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन बर्दापूर पोलीसांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा