Subscribe Us

header ads

मोदी साहेब त्रिपुरा जाळण्यासाठी तो पाकिस्तानात नव्हे भारतात आहे----- प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधि_ भारताच्या उत्तरपूर्व राज्यातील एक राज्य त्रिपुराआहे, परंतु काही दिवसापासून आगीच्या लपेट्यात आलेला आहे कारण त्रिपुरा येथील हिंदूत्ववादी संघटनान्नी उद्रेक माजवलेला आहे आणि त्या उद्रेकाला ख़तपाणी भाजपाचाच असणार हे नवीन नाही या दहशतवादी हल्यांचा लोकसेना संघटना जाहिर निषेध करुन देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व अल्पसंख्याक मंत्री यांना लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी  निवेदनाद्वारे मागणी केली आहे की त्रिपुरा दंगल तात्काळ थांबवावी, दंगलीतील दोषीवर  कड़क कार्यवाही करावी, जीवित हानी व ज्यांच्या संपत्तीचे नुकसान झाले त्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी व त्रिपुरा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी व लोकसेने कडून हे आठवण करुन देण्यात आली की राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्री होत असतांना देशाचा सर्वोच्च ग्रन्थ भारतीय संविधानावर हाथ ठेवून शपथ घेतली जाते की मी माझ्या पदाचा दुर्योपयोग करणार नाही देशाच्या तमाम जनतेचा विकास व संरक्षण करीन पण देशाची अवस्था बगीतल्यावर अस वाटत नाही की आपण व आपली सरकार संविधानाच्या मार्गाने काम करत आहे. देशात जिकडे तिकडे अराजकता पसरलेली आहे देशातील एकशे पंचवीस कोटी जनताचे आपण सेवक आहात पण लाज वाटते तुमच्या कारबाराकड़े  बघितल्यावर. वरील मागणीकड़े सरकारने गंभीरतेने घेवून त्रिपुरा राज्यात शांततेसाठी प्रयत्न करावे नसता लोकसेना संघटना आंदोलन करणार असा इशारा नरेन्द मोदी यांना लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक