Subscribe Us

header ads

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडी ला जाणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळी चा अपघात तीन ठार; शासनाने प्रत्येकी दहा लाखांची मदत करावी---- जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब भांगे

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणी मजूर कारखान्याला स्थलांतर करत आहेत .या स्थलांतरामुळे एका निष्पाप लहान या चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला असून ते बाळ देवाला प्रश्न विचारते ?

देवा सांग मि तुझा काय गुन्हा केला तु मला ऊस तोड मजुराच्या पोटी जन्म कारे दिला. दिला तो दिला पुन्हा जीवन  पहान्या आदि मला घेऊन गेला. माझा तर विश्वास  बसत नाही देवा तु आहे तरी कुठे ? माझ्या आईला तरी यातुन सावरण्याची शक्ति दे

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणी मजूर महाराष्ट्र-कर्नाटक याकडे स्थलांतर करत आहेत .या स्थलांतर मध्ये ट्रॅक्टरचा एक्सीडेंट होऊन ट्रॅक्टर पलटी होऊन वडवणी तालुक्यातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चिमुकले बाळ आहे. तर बाकी फार गंभीर जखमी आहे व यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात यांच्यावर उपचार चालू आहेत.वडवणी तालुक्यातील तीगाव तांडा येथील एक महिला व बीड तालुक्यातील वलीपुर येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.यामुळेच कुटुंबावर व महाराष्ट्र राज्यातील सर्व ऊसतोड मजुरांवर शोककळा पसरली आहे.ऊस तोडणी मजूर याच्या या आपघाताकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी .
अशी मागणी आजाद हिंद ऊस तोडणी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब भांगे यांनी केलेली आहे.
ऊस तोडणी मजुरांची फरफड या पूर्वी अशीच वर्षानुवर्षे चालत आहे . मी ऊस तोडणी मजुरांचा नेता म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्या फक्त मता पुरता ऊसतोडणी मजुरांचा वापर करू नका असे देखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे आझाद हिंद ऊस तोडणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब भांगे यांनी केली आहे.ऊस तोडणी मजुर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक याकडे सध्या स्थलांतर करत आहेत.हा अपघात मोहोळ तालुक्यात घडला असून याद उषाताई व दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून हा अपघात इतका भीषण होता की यात अनेकांचे हातपाय मोडले आहेत.  तमाम महाराष्ट्रातील सर्व ऊस तोडणी मजुरांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे.आपल्या पोटासाठी घरदार सोडून चार महिन्यासाठी रवाना झालेल्या या कुटुंबां कडे कोण लक्ष देणार ?प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत या सरकारने ऊस तोडणी मजुरांना जर जाहीर नाही केली तर आझाद हिंद संघटनेच्यावतीने संपूर्ण बीड जिल्ह्यात तहसील समोर आमरण उपोषण केले जाणार असल्याचे आझाद हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब भांगे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा