Subscribe Us

header ads

रा गे शिंदे महाविद्यालयातील डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
 
परंडा -दिनांक 22 ऑक्टोबर 2021 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने   पीएचडी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे . त्यांना मिळालेल्या नियुक्तीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दिपा सावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  सांस्कृतिक विभागाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता .या सत्कार समारंभ प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदांशिवे ,प्राणी शास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे ,परीक्षा प्रमुख डॉ प्रशांत गायकवाड ,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ अरुण खर्डे ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक