Subscribe Us

header ads

आजादी का अमृत महोत्सव महाजीविका अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील बँक अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

आजादी का अमृत महोत्सव महाजीविका अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील बँक अधिकारी  यांची कार्यशाळा संपन्न



नांदेड)दि.१३ जून 2022 रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आजादी का अमृत महोत्सव व उमेद- महाजीविका अभियान   अंतर्गत  नांदेड जिल्ह्यातील सर्व बँक अधिकारी यांची एक दिवसीय ओरिएंटेशन कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक उमेद अभियान जिल्हा परिषद नांदेड मा. श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम अध्यक्षस्थानी होत्या त्याच बरोबर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. संजय  तुबाकले यांनी केले याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. कुलकर्णी सर ,भारतीय स्टेट बँक नांदेड चे श्री. कुणाल जगताप , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री .अनिल गचके, तसेच SBI, MGB, UBI, BOI, BOB,BOM,Canara, HDFC, ICICI,IOB, IDBI, Axis,Indian Bank, आदी बँकचे जिल्हातील सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.गजानन पातेवार यांनी 

केले या कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक राज्य आर्थिक सल्लागार मा.दीक्षित सर यांनी पहिल्या सत्रात बँक खाते उघडणे कर्ज वितरण करणे आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे विविध प्रकारचे विमे काढणे प्रत्येक समूहाला आर्थिक समावेशन करणे याबद्दल सोप्या पद्धतीत माहिती दिली. दुसऱ्या सत्रात समुहाना आर्थीक समावेशन कसे करावे या बाबत विवीध उदाहरणासह पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सर्व बँकर्सना माहिती दिली एस एच जी बँक लिंकेज आर्थिक साक्षरता डिजिटल पारदर्शकता बँकिंग सामाजिक सुरक्षा योजना व एस एच जी आर बी आय मार्गदर्शक पुस्तिका मधील सर्व बँकर्सना माहिती दिली.या बँक कार्यशाळेचे नियोजन जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन श्री .माधव भिसे जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन श्री.द्वारकादास राठोड जिल्हा व्यवस्थापक एम आय एस श्री .गणेश कवडेवाड, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग श्री.धनंजय भिसे  कौशल्य समन्वयक अतिष गायकवाड , हणमंत कंदुरके सर्व तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक हे उपस्थित होते,  तालुका अभियान व्यवस्थापक श्री. रमेश थोरात यांनी कार्यक्रमाचा समारोप केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा