Subscribe Us

header ads

नगरसेवकांचे उपोषण नंतर अखेर आज पालवन चौक, नगर रोड, धानोरा रोड रस्त्याचे कामास सुरवात

बीड स्पीड न्यूज 


नगरसेवकांचे उपोषण नंतर अखेर आज पालवन चौक, नगर रोड, धानोरा रोड रस्त्याचे कामास सुरवात 


बीड प्रतिनिधी-: बीड शहरातील धानोरा रोड साठी केलेल्या आमरण उपोषणाला यश आली असून आज आज प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये रस्ते कामास सुरुवात झाली.काही दिवसांपूर्वी माझे सहकारी नगरसेवक भैय्या मोरे, रंजित बनसोडे हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालवन चौक ते नगर रोड (धानोरा) या रस्त्यासाठी आमरण 

उपोषणास बसले होते. तेव्हा मुख्याधिकारी श्री. उमेश ढाकणे यांनी सदरील काम लवकर सुरू करू असे आश्वासन देवून आमरण उपोषण सोडले होते.
आज सदरील कामास प्रत्यक्ष सुरवात झाली असून सहकाऱ्यांसमवेत भेट देवून पाहणी केली. या होणाऱ्या डांबरी रस्त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय आता टळणार आहे.याप्रसंगी नगरसेवक गणेश वाघमारे, भैय्या मोरे, रंजित बनसोडे, विलास विधाते, भीमराव वाघचौरे, विठ्ठल गुजर, डॉ. रमेश शिंदे, प्रा. अमोल वाघमारे, हामेद चाऊस, निवृत्ती डोके, जाधवर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा