Subscribe Us

header ads

एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

शेवगाव_राज्यातील विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असतानाच अहमदनगर  जिल्ह्यातील शेवगाव बस डेपोत एक धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव येथे परिवहन महामंडळाच्या चालकाने आज दि.29 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दिलीप हरिभाऊ काकडे (वय 50) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. सरकारच्या धोरणावर कर्मचारी नाराज असल्याने संपाची हाक दिली आहे. त्यातच आज सकाळी शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली आहे. दिलीप काकडे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा