Subscribe Us

header ads

पुणे येथे सुवर्ण परिचर्चा बैठक संपन्न

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलकःआत्माराम ढेकळे,पुणे)

पुणेः- अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास व शोध संस्थान च्या वतीने आयोजित "पुणे जिल्हा सुवर्ण परिचर्चा बैठक "राष्ट्रीय महिला अध्यक्षा पुष्पाताई सोनार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली.अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास व शोध संस्थान (ABSSVSS)च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा पुष्पाताई सोनार यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात पुणे येथे 'सुवर्ण परिचर्चा बैठक "आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी संस्थान (ABSSVSS)चे कार्य व उद्देश ,कार्य आढावा त्यामध्ये प्रामुख्याने सुवर्णकार समाजासाठी 'महाविश्वविद्यालय' उभारणे, सुवर्णकार समाज कारागिरांना आधुनिक ज्ञान मिळावे या हेतुने कार्यशाळेचे आयोजन,रोजगार /उद्योग आदी माहिती राष्ट्रीय महिला अध्यक्षा पुष्पाताई सोनार यांनी या बैठकीत मार्गदर्शन करतांना देऊन संपुर्ण भारतात २८ राज्यात सर्व सुवर्णकार संघटित करण्याचा जोमाने प्रयत्न आहे. सुवर्णकार समाजाला राजकीय क्षेत्रात संधी का मिळत नाही.समाजातुन राज्यसभा ,लोकसभा मध्ये प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करणे आहे. या हेतुने रणनिती आखण्यात येत  आहे .या दृष्टीने 'स्वर्णकार समाज चेतना यात्रा' या यात्रेचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.राजपुत हे करीत आहेत .असेही आपल्या मार्गदर्शनपर चर्चेतुन सर्वांना सांगितले . या बैठकीचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ.अर्चना सोनार यांनी केले.

चिंचवड भागातील पुर्णानगर येथील डाॕ.ईश्वर सोनार यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी  दीप प्रज्वलन करण्यात आले .त्यानंतर उपस्थितांनी आपल्या कार्यांचा आढावा देऊन परिचय दिला.या सर्वांचे स्वागत करण्यात आले.या बैठकीस प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय काजळे,वसंत सोनार,अनिल तिळवणकर,भिकण भामरे,गौरव सोनार ,आशिष सोनार,प्रितेश सोनार,अजिंक्य सोनार,लक्ष्मीकांत नवले तसेच  सौ.ज्योतीताई जोशी,सौ.शितल मंदानेकर,सौ.श्रृती बागुल,सौ.चैत्राली भामरे,श्रीमती हिराताई सुर्यवंशी,सौ.संगीताताई नवले आदी निमंत्रित उपस्थित होते.याप्रसंगी सामाजिक कार्य व समाज एकतेसाठी सर्वांनी एकत्र यावे असे विजय काजळे यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.तर विखुरलेल्या सोनार समाजाची माहिती घेऊन संशोधनपर पी.एच.डी.करण्याचा मनोदय अनिल तिळवणकर यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा