Subscribe Us

header ads

रा गे शिंदे महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल कोकाटे एम एससी परीक्षेत महाविद्यालयातून सर्वप्रथम

 बीड स्पीड न्यूज

 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 

परंडा दिनांक 13 ऑक्टोबर 2021 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील एम एससी वनस्पतीशास्त्र विषयाची विद्यार्थिनी स्नेहल सुधाकर कोकाटे हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये घेतलेल्या   परीक्षेमध्ये  महाविद्यालयातून 91 टक्के पेक्षा जास्त मार्क्स सह ओ ग्रेड  घेऊन सर्वप्रथम आली आहे.
त्याचबरोबर उच्च शिक्षणाचा मूळ हेतू संशोधन असल्याने संशोधनासाठी प्रकल्प दिला होता तिने तो पूर्ण केला आहे याचबरोबर तिने आंतरराष्ट्रीय बायो इन्फोटेक या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल मध्ये हाडजोडी या वनस्पतीच्या मुळांमध्ये मायकोरायझा नावाची बुरशी यावर संशोधन करून संशोधन पेपर प्रकाशित केला. संशोधन पेपर प्रकाशित करण्यासाठी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ प्रकाश सरवदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहल कोकाटे हिला मिळालेल्या यशाबद्दल  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी स्नेहल कोकाटे सह तिच्या आई-वडिलांचा पुष्प देऊन महाविद्यालयांमध्ये सत्कार केला. यावेळी वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, डॉ सचिन चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. सांस्कृतिक विभागामार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा