Subscribe Us

header ads

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


बीड स्पीड न्यूज 

कडा प्रतिनिधी_  वाघळुज घाटात ट्रक- दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. मकरंद भालेकर (वय  ३०, रा. शेरी बुद्रुक ) असे मृत तरुणाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील युवक मकरंद भालेकर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास कड्यावरून नगरकडे दुचाकीवर जाताना दरम्यान, अहमदनगरवरून जामखेडकडे एक ट्रक  MH- 16- AY- 8586  येत होता. दोन्ही वाहनांची वाघळूज घाटातील वळणावर समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार  मकरंद भालेकर याचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी जोरात होती की यात दुचाकीचा चुराडा झाला आहे. ऐन दसरा सणाच्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा