Subscribe Us

header ads

कर्जबाजारी पणास कंटाळून तडोळी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)_तालुक्यातील तडोळी येथील तरुण शेतकरी नगनाथ श्रीरंग सातभाई (वय 40 वर्ष) यांनी शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी कर्जबाजारी पणाला व अतिवृष्टीमुळे झालेल्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी चे संकट पिच्छा सोडत नसून या भयाण परिस्थिती पुढे शेतकर्यांनी गुडघे टेकले असून आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. त्याचाच भाग तडोळी गावात पहावयास मिळाला. कर्जबाजारी पणाला कंटाळून या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली.गेल्या तीन वर्षापासून पेरूच्या  झाडांची लागवड केली होती. तीन वर्षापासून कृषी कार्यालयाकडून आजतागायत अनुदान भेटले नाही. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा सुद्धा या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे.नापिकीला व कर्जबाजारी पणास कंटाळलेल्या 

शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची गरज संभाजी ब्रिगेड परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज 

शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची गरज असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशाप्रकारे रोकता येतील याकडे गांभीर्याने बघावे व उपाययोजना करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत पण संबंधित कार्यालयामार्फत राबवल्या जात नाहीत. जरी राबवल्या तरी संबंधित कर्मचारी अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत, शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही. बरेच शेतकरी तर  अशिक्षित आहेत त्यांना कसल्याही प्रकारची योजनेची माहिती नसते त्या शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा असते पण तसे होताना दिसत नाही. याही बाबीकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पेरू लागवडीची फाईल अनुदान या शेतकऱ्याला मिळाले असते तर आज या तडोळी येथील शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती असेही या प्रसिद्धीपत्रकात देवराव लुगडे महाराज यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा