Subscribe Us

header ads

धम्मचक्र परिवर्तन व वाचन प्रेरणा दिन उत्सहात साजरा

बीड स्पीड न्यूज

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी)  ग्रंथ हे माणसाचे मस्तक सशक्त करतात, व सशक्त मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. ग्रंथाकरीता राजगृह बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव प्रज्ञासूर्य होय. ‘विद्या हे माझे उपास्य दैवत आहे. माणसापेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो. ही गोष्ट मात्र खरी आहे.’ डॉ. बाबासाहेबांच्या ‘वाचाल तर वाचाल’ या उद्गारांची आठवण ठेवावी असे प्रतिपादन पुज्य भिक्खु धम्मशील यांनी प्रतिपादन केले.सम्राट अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र परिवर्तन दिन, थोर शास्त्रज्ञ भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती म्हणजेच वाचन प्रेरणा दिन व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 119 व्या जयंतीचे औचित्य साधून ‘वाचाल तर वाचाल’ या फिरते मोफत वाचनालयातर्फे सम्राट अशोक बुध्द विहार बीड येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विहारात‘वाचाल तर वाचाल’ तर्फे तिसावे केंद्र पुज्य भिक्खु धम्मशील यांच्या हस्ते माजी शिक्षणाधिकारी सखाराम उजगरे, हेड पोस्टमास्तर अमरसिंह ढाका व माजी नगरसेवक राजु जोगदंड, प्रा.डॉ. शिवाजीराव दिवाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फुले शाहु, आंबेडकर विचारांचे शंभर पुस्तकांचे वाटप केले. पुस्तक वितरणाची जबाबदारी उपासक शुभम धन्वे यांनी स्वयंस्फुर्तपणे स्विकारली. सर्व प्रथम तथागतांना पुष्प व सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पुज्य भुन्तेंनी धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांसह सर्वांनी त्यांचा आदर्श घेवून जीवनक्रमन करावे असे सांगितले. या प्रसंगी अमरसिंह ढाका यांनी 

प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना लहानपणीच वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देण्या ऐवजी महापुरूषांच्या जीवन चरित्रांची व अंधश्रध्दा पासून दूर रहाण्याकरीता विज्ञानवादी विचारांची पुस्तके दिली पाहिजेत व त्यांच्याकडून वाचून घेतली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके आवर्जुन वाचून त्यानुसार सुजान नागरीक व्हावे. असे अनेक उदाहरणे देवून स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘वाचाल तर  वाचाल’ चे डी.जी. वानखेडे यांनी केले व सर्व पुस्तकांचा विद्यार्थी, उपासक, उपासिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमास उपासक बी.जी. दळवी, सदाशीव निसर्गंध, अमित चांदणे, राजरत्न वाघमारे, राजु चव्हाण, प्रशांत वासनीक, भास्करराव सरपते, कॉन्ट्रॅक्टर खंडारे, राहुल शिंदे, राजरत्न वाघमारे, उपासिका छाया वाघमारे, सुनंदा धन्वे, वंदना वाघमारे व बलभिम नगर परिसरातील बहुसंख्य उपासक, उपासिकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निकीता वाघमारे, तनिष्का जाधव, राजकिरण जाधव यांनी बहुमोल परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन महामानव सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष जी.एम. भोले सर यांनी केले. फळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा