Subscribe Us

header ads

केज तालुक्यातील दैठण येथे तरूणाचा अज्ञात व्यक्ती कडून खुन !

बीड स्पीड न्यूज 

केज प्रतिनिधी (दि. २०) _केज तालुक्यातील दहिटना येथे एका ३८ वर्षीय तरुणांचा डोक्यात धारदार शस्त्राचे घाव घालून अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. खुनाचा तपास करण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.या बाबतची माहिती अशी की, दि. २० बुधवार ऑक्टोबर रोजी केज तालुक्यातील दैठणा येथे विलास चंद्रकांत मुळे वय (३८ वर्ष) या विवाहित तरुणांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार शस्त्र घालुन खून केला. मयताचे प्रेत हे गावच्या पश्चिमेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळून सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले. मयताच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी बीड येथील श्वनापथकाच्या मदतीने तपास करण्यात येत आहे. 

मयत विलास चंद्रकांत मुळे याच्या पश्चात पत्नी अर्चना मुळे वय (३३ वर्षे) मुलगी कु. वेदिका वय (१२ वर्ष) व आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, अनिल मंदे, जसवंत शेप, शेख, शेषेराव यादव, हुंबे यांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल करपे यांनी प्रेताचे शवविच्छेदन केले असल्याची माहिती आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच यातील आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा