Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर एमआयडीसीमधील सार्वजनिक शौचालय, पोलीस चौकी व रस्त्यासाठी प्रयत्नशिल;एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडून घेतला आढावा; जागा उपलब्धतेसाठी दिल्या सूचना

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- शहरा लगत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीत रामतिर्थ परिसरात सार्वजनिक शौचालय, पेठ बीड पोलीस अंतर्गत नवीन पोलीस चौकी तसेच पाच फुट ऐवजी दहा फुट रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्रयत्नशिल असून याबाबत त्यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून जागा उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ पाठवण्याच्या सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.बीड शहरालगत औद्योगिक विकास महामंडळाचे रामतिर्थ परिसरात कार्यालय असून या ठिकाणी अविनाश धांडे यांचे घरते मेहरबा मंदिरापर्यंत पाच फुटी रस्ता आहे. हा रस्ता दहा फुटी करण्यात यावा त्याचबरोबर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्यात यावा आणि नवीन पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी या भागातील शिष्ट मंडळाने आ.संंदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी एमआयडीसीच्या उपअभियंता लुलेकर मॅडम, सहाय्यक अभियंता मगरे व इतर अधिकार्‍यांची बैठक बोलवून तीनही विषयांवर सकारात्मक चर्चा केली. स्थानिक नागरिकांचेही म्हणणे लक्षात घेता आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सदर तीनही 

प्रश्ना संदर्भात तात्काळ प्रस्ताव मंंजुरीसाठी सादर करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. शौचालय व रस्त्यासाठी आम्ही निधी देवून एमआयडीसीने जागा द्यावी अशा सूचना करत पोलीस चौकी झाल्यानंतर या भागातील नागरिकांना, व्यापार्‍यांना व औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना मदत होईल. यासाठी एमआयडीसी कार्यालयाने सहकार्य करावे असेही आ.संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे मॅडम यांनाही निवेदन दिले आहे. यावेळी बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे, बिभीषण लांडगे व व्यापारी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा