Subscribe Us

header ads

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड तालुकाध्यक्षा जयश्री वाघमारे यांच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान

 बीड स्पीड न्यूज

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड(प्रतिनिधी)-बीड तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने जिजाऊ, सावित्री, रमाई लेकींचा सन्मानपत्र व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी समाज सेविका रेखाताई क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार व बीड विधानसभेचे आमदार संदीपभैया क्षीरसागर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड जिल्हा निरीक्षक वैशालीताई पाटील, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा जिल्हा परिषद सदस्य रेखाताई क्षीरसागर, बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीताताई तुपसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला आघाडीच्या  तालुकाध्यक्षा जयश्री ताई वाघमारे यांच्या वतीने शनिवार दि. 16 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी भवन येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेविका रेखाताई क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक मनिषाताई लटपटे, पत्रकार ऋतुजा सोनवणे, महिला तक्रार निवारणच्या दिपाली सावंत, वैद्यकीय सेविका डॉ.सोनम गोल्हार-जायभाय, महिला शेतकरी लियाकतबी गुलाब पठाण, उद्योजिका ललिता वाघमारे, शिक्षिका वनिताताई चाळक, सुलताना बाजी शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रेखाताई क्षीरसागर यांनी महिलांनी स्वावलंबी बनावे स्वतःच्या पायावर उभे राहावे व असे मार्गदर्शन केले.  यावेळी  संतोषराव जाधव, खलील भैया पठाण, आदिंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा