Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्यांच्या प्रयत्नातून नगर रोडवरील खड्डे बुजवण्यास सुरूवात लवकरच राजुरीवेस पासून चऱ्हाटा फाटा पर्यंत नगररोड हॊणार बीडकराना अभिमान वाटेल असा रस्ता

बीड स्पीड न्यूज 

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची उपस्थिती; खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना


बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चर्‍हाटा फाटा ते नवगण राजुरीपर्यंत नगर रोडवर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने शहरातील वाहनधारकांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता नगरा रोडवरील हे खड्डे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बुजवले जात असून खड्डे बुजवण्याचे काम आज प्रत्यक्षात उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. सदर खड्डे दर्जेदार व चांगल्या पध्दतीने बुजवण्याच्या सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तसेच राजुरी वेस ते चऱ्हाट फाटा नवगन राजुरी हा नगर रोड हा रस्ता बीडकराना अभिमान वाटेल असा रस्ता नेशनल हायवे 

361 एफ अंतर्गत केला जाणार आहे.यासाठी आ. संदीप भैय्या क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील आहेत. यातील काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सदर रस्त्याच्या कामास सुरूवात होणार आहे.बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नगर रोडवर चर्‍हाटा फाटा ते नवगण राजुरीपर्यंत मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना याची मोठी अडचण होवू लागली. वाहन चालवणे अवघड झाले, सदर खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे केल्यानंतर मागील काही दिवसातच नगर रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम पाऊस उघडल्यानंतर नॅशनल हायवेच्या अ‍ॅथोरिटीकडून सुरू करण्यात येणार होते. परंतू मागील काही दिवसात सतत सुरू असलेल्या पावसामुळे खड्डे बुजवता आले नाहीत. आ.संदिपभैय्या क्षीरसागर यांनी पुन्हा नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीच्या अधिकार्‍यांना तसेच जिल्हा प्रशासन यांना तात्काळ सूचना देवून नगर रोडवरील खड्डे बुजवण्याचे निर्देश दिल्यानंतर 

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आठ दिवसामध्ये पूर्णपणे नगरा रोडवरील खड्डे बुजवले जाणार असून हे खड्डे चांगल्या पध्दतीने व गुणवत्तापूर्ण बुजवले जावेत अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. यावेळी हेमंत क्षीरसागर, अशोक रोमण, झुंजार धांडे, अमोल पारवे,आमेर आण्णा, शेख मोहसीन, पंकज बाहेगव्हाणकर, पिंटू पवार,अजिंक्य पांडव, गणेश जाधव, दादा हातागळे ,बाळू वायभट, विष्णू घोलप यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा