Subscribe Us

header ads

पीक कर्जासाठी शेतकर्‍यांचे दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण

बीड स्पीड न्यूज 

बीड_गेवराई तालुक्यातील उमापूर येथील स्टेट बँकेने शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास नकार दिला असून या बँकेच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. बँक प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली मात्र या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकर्‍यांचा समावेश झालेला नाही. उमापूर शाखेतील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.त्यांना बँकेने पीक कर्जही दिलेले नाही. निष्क्रीय बँक प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलरे आहेत. या वेळी मनोज शेंबडे, अशोक आमटे, भूषण कदम, कैलास ढोले, आनंद आहेर, लक्ष्मण आहेर यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा