Subscribe Us

header ads

परंडा येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 बीड स्पीड न्यूज

 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 

परांडा - दिनांक 15 ऑक्टोबर 2021धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परांडा येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी संचलित श्रीमान राम भाई शहा रक्तपेढी बार्शी यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन येथील पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फुले-आंबेडकर  विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे ,उस्मानाबाद जिल्हा वंचित बहुजन आघाडी महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे, जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे ,परंडा  तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ  परांडा शहराध्यक्ष किरण बनसोडे ,तालुका महासचिव दयानंद बनसोडे ,तालुका प्रवक्ता रणधीर मिसाळ, युवा नेते फिरोज तांबोळी, तालुका संघटक मधुकर सुरवसे, तालुका सदस्य अरुण सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे, चंद्रहास बनसोडे ,राज बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष महावीर बनसोडे ,समता सैनिक दलाचे अश्रू वाघचौरे ,गणेश सरवदे, संदेश शिंदे ,बनसोडे कानिफ ,लक्ष्मीकांत बनसोडे ,डॉ सुभाष मारकड ,विवेक बनसोडे , बालाजी माळी, सतीश बनसोडे ,इर्शाद बागवान, बाळासाहेब बोकेफोडे, पत्रकार आप्पासाहेब शिंदे,  पत्रकार समीर ओव्हाळ , पत्रकार अमोल निकाळजे ,खाजा मोमीन, युवा नेते शंकर लांडगे ,अभिजीत शंकर पालके, अरविंद बनसोडे ,अरुण बनसोडे  दीपक गायकवाड ,हवालदार गायकवाड, पत्रकार गंगावणे  तु .दा. आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . रक्तदान शिबिर निमित्त सकाळी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. या शिबिरांमध्ये एकूण  ५१ दात्याने रक्तदान केले.
यावेळी इंडियन सोसायटी संचलित श्री राम भाई शहा रक्तपेढी बार्शी येथील राहुल मस्के, सुधीर सुमन, सचिन मांजरे, बापू ननवरे ,अर्जुन दळवी यांनी सहकार्य केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा