Subscribe Us

header ads

अभूतपूर्व धम्म रॅलीने वर्षावासाची सांगता; भन्ते धम्मशिल यांच्या मौलिक मार्गदर्शनाने वातावरण धम्म मय

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी) 23 आक्टोंबर नागोबा गल्ली येथील सम्यक संबुद्ध विहार समिती च्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासुन परिवर्तवादी धम्म चळवळ गतिमान करण्याचे कार्य सुरु असुन  सर्वसमावेशक समतेवर आधारित तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म विश्वरत्न परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संबध मानवांच्या कल्याणा साठी स्वीकारत समाजाचा उद्धार केला आज मितीस धम्म चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक धम्म उपासक उपासिकांची असुन धम्माचे आचरण करत आपले आयुष्य समाधानाने जगावे असे आव्हान पुज्य भन्ते धम्मशिल यांनी सम्यक संबुद्ध विहार येथे आयोजित वर्षावास सांगता कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित धम्म उपासक उपासिकानां केलेगेल्या तीन महिन्यापासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले कार्यक्रमानंतर समीतीच्या वतीने भोजन दान करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीस महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन आदरणीय भन्तेजी च्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्म प्रचारक राजु जोगदंड यांनी केले तर सुत्रसंचालन आदर्शराजे जोगदंड यांनी 

केले.याप्रसंगी नगरसेवक अँड विकासजी जोगदंड, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शीतलकुमार सुकाळे,बाबासाहेब (भिगरेश) जोगदंड, विनोद जोगदंड,बाळू जोगदंड, विलास जोगदंड,अशोक वाघमारे,रणजित इनकर,मंगेश जोगदंड,संदीप जाधव,आदित्य जोगदंड,महादेव वंजारे,गोरख जोगदंड,मुकेश जोगदंड,प्रविण जोगदंड,लक्ष्मण जोगदंड,राम जोगदंड, भिम शाहीर सुरज वंजारे. भीम स्वराज सेनेचे  कट्टर समर्थक नवनाथ गोरे.कमलताई जोगदंड,चंद्रकलाताई जोगदंड,जलसामामी इनकर,मालनकाकू जोगदंड,  रेखाताई जोगदंड,सोजरकाकू जोगदंड,सोजरताई सोनवणे,सारिकताई जोगदंड,मनीषाताई जोगदंड,मनिषाताई गायकवाड,निषाताई कांबळे, सविताताई जोगदंड,मीराताई कांबळे,अरुणाताई पवार,संजवनीताई कांबळे,सह आदी धम्म उपासक उपासिका  उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा