Subscribe Us

header ads

शिल सदाचारणाने वर्तन केल्यास समाज सत्कारित करतो --- कँप्टन राजाभाऊ आठवले

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी /  दि. 22 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघ, कार्यालय धानोरी रोड, बीड येथे सभासद शेवाळे रघुनाथ नारायण यांचा 63 वाजन्मदिन (वाढदिवस) साजरा करण्यात आला. आयु. यशवंत कदम यांच्या मार्फत महासंघाचे वयोवृद्ध 100 सभासदांचा अविरत जन्मदिन साजरा करण्याच्या उपक्रमाने से.ब.अ-क. महासंघाच्या वयोवृद्ध सभासदामध्ये नव चैतन्य जागृत करण्याचे काम करत आहेत. दुसर्‍याच्या आनंदात आपला आनंद या सेवाभावनेने ते निस्वार्थपणे करत आहेत.
     या कार्याकरिता प्रत्येक व्यक्तीच्या जन्मदिनाचा खर्च 500 * 100 = 50,000/- रू प्रति वर्षाला खर्च करणार आहेत. याआगोदर १ नोव्हेंबरला सखाराम उजगरे व हा रघुनाथ शेवाळे यांचा दुसरा कार्यक्रम होत आहे. याप्रसंगी से.ब.अ-क. महासंघाचे जील्हाध्यक्ष कॅप्टन आठवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिल, सदाचार, पंचशीलाचे पालन करने म्हणजे जीवनाचे मंगल साधण्याचा मार्ग आहे. असे पटवून दिले  याप्रसंगी शिवाजीराव पंडित, बी.पी. शिरसाट, काशीनाथ वाघमारे, डी.जी. वानखेडे, अनंत सरवदे, डी.एम. राऊत, उमाजी आठवले यांनी आयु. शेवाळे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या व 
 बळीराम दळवी, डाँ. किसनराव साळवे, आशाताई विद्यागर, सुधाकर विद्यागर, व कार्यक्रमाचे प्रायोजक यशवंत राणाप्रताप कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जी.एम.भोले यांनी केले. तर सरणतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा