Subscribe Us

header ads

नागोबा गल्लीत अभूतपूर्व धम्म रॅलीने वर्षावासाची सांगता; स्व- खर्चातून भिक्कु निवासासाठी एक स्वतंत्र रूम बांधणार- अशोक भाऊ वाघमारे

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी) 23 आक्टोंबर नागोबा गल्ली येथील सम्यक संबुद्ध विहार समिती च्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासुन परिवर्तवादी धम्म चळवळ गतिमान करण्याचे कार्य सुरु असुन  सर्वसमावेशक समतेवर आधारित तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म विश्वरत्न परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संबध मानवांच्या कल्याणा साठी स्वीकारत समाजाचा उद्धार केला. आजच्या काळात धम्म चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक धम्म उपासक उपासिकांची असुन धम्माचे आचरण करत आपले आयुष्य समाधानाने जगावे असे आव्हान पुज्य भन्ते धम्मशिल यांनी सम्यक संबुद्ध विहार येथे आयोजित वर्षावास सांगता कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित धम्म उपासक उपासिकानां केले.गेल्या तीन महिन्यापासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले कार्यक्रमानंतर समीतीच्या वतीने भोजन दान करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीस महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन आदरणीय भन्तेजी च्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्म प्रचारक राजु जोगदंड यांनी केले तर सुत्रसंचालन आदर्शराजे जोगदंड यांनी केले.याप्रसंगी जेष्ठ शांतिराम जोगदंड, गौतम सोनवणे, किसन जोगदंड,रिपाइं चे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ वाघमारे, नगरसेवक ॲड. विकास जोगदंड, पत्रकार नितीन जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिपाइं चे जिल्हा सचिव विलास जोगदंड, राष्ट्रवादी चे शहर सरचिटणीस बाळासाहेब जोगदंड, विनोद जोगदंड, वंचित चे संदीप जाधव, रणजित इनकर, मंगेश जोगदंड,आदित्य जोगदंड, महादेव वंजारे,गोरख जोगदंड, मुकेश जोगदंड,प्रविण जोगदंड, लक्ष्मण जोगदंड,राम जोगदंड, भिम शाहीर सुरज वंजारे,कमलताई जोगदंड,चंद्रकलाताई जोगदंड, जलसा इनकर, मालनकाकू जोगदंड, रेखाताई जोगदंड,सोजरकाकू जोगदंड, सोजरताई सोनवणे,सारिकताई जोगदंड,मनीषाताई जोगदंड, संजीवनी जोगदंड, मनिषाताई गायकवाड,निषाताई कांबळे, सविताताई जोगदंड, मीराताई कांबळे,अरुणाताई पवार,संजवनीताई कांबळे,सह आदी धम्म उपासक उपासिका  उपस्थित होते.


भिक्खूंच्या निवासासाठी दिलेला शब्द पाळणार- अशोक वाघमारे

मागील काही महिन्यांपूर्वी ना गोगा गल्ली येथील सम्यक संबुद्ध व्यवहारासाठी बौद्ध विकून साठी स्वखर्चातून एक स्वतंत्र रूम बांधून देणार असा शब्द दिला होता मात्र कोरोणाच्या काळात तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आता दिलेला शब्द येत्या काही दिवसात दिवसातच पूर्ण करून बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी स्वखर्चातून बांधकाम करून देणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा