Subscribe Us

header ads

आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी, मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला

बीड स्पीड न्यूज 

गेवराई प्रतिनिधी_शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज गुरुवारी सर्वपक्षीय शेतकरी संताप मोर्चा गेवराई तहसील कार्यालयावर धडकला आहे. या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे आ.लक्ष्मण पवार हे करत असून हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान आ.पवार यांच्या कार्यालयापासून निघालेला हा मोर्चा शास्त्री चौक, बेदरे गल्ली, मेनरोड मिरवणूक मार्गे तहसीलवर धडकला असून शासन विरोधी घोषणाने गेवराई शहर दणाणून गेले आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, शेतातील उभे पिके, नागरिकांची रहाती घरे, पशुधन, रस्ते, पुल व तलाव, शेततळे आदींचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शासनाकडून मिळणे हा नागरीकांचा हक्क आहे. परंतु आजतागायत राज्य शासनाकडून कुठल्याच प्रकारच्या मदतीची अधिकृत घोषणा किंवा प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. हे दुर्दैवाने नमुद करावे लागत आहे. त्यामुळे, झोपलेल्या या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महत्त्वपूर्ण मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देवून लोकांना तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान आ.पवार यांच्या नेतृत्वाखाली आज दि.14 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून, शास्त्री चौक, बेदरे गल्ली, मेनरोड मिरवणूक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला आहे. दरम्यान गेवराई विधानसभा मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करणे, पिक नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रू. मदत द्या, अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमीनीला हेक्टरी 38 हजार रूपये मदत द्या, फुटलेले तलाव व धोका सदृष्य स्थितीमधील तलावांची दुरुस्ती करणे, वाहुन गेलेले रस्ते व पुलांची दुरुस्ती करणे, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहीर करा, विद्यार्थ्यांची शैक्षणीक फिस माफ करा, सक्तीची कर्ज वसुली व विजबिल वसुली थांबवा, गायरान धारक शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान द्यावे अशा मागण्या घेऊन हा भव्य संताप मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जे.डी. शहा, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अजय दाभाडे, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड, शेतकरी संघटनेचे रामेश्वर गाडे, शेतकरी नेते अशोक भोसले, किसान आघाडीचे देविदास फलके, मच्छिंद्र गावडे आदींसह हजारोंच्या संख्येने शेतकरी या संताप मोर्चात सहभागी झाले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा