Subscribe Us

header ads

कोरोना रूग्णांच्या अतिरिक्त बिलांचा परतावा करा - आरोग्य हक्क परिषदेत मागणी

 बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_दि.13  -  बीड जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात अतिरिक्त बिलास बळी पडलेल्या रूग्णांची शोध मोहीम सुरू करून,त्यांच्या बिलांचे ऑडिट करावे व रूग्णालयाकडून आकारलेल्या बिलांचा परतावा महिन्याभरात संबंधितांना देण्याची प्रक्रिया करावी.यात कोविड विधवांना अतिरिक्त बिलास प्राधान्य क्रम देऊन यांच्या परताव्यास गती द्यावी ,अशी मागणी बीड येथे आयोजित आरोग्य जनसुनवाई मध्ये करण्यात आली.सामाजिक न्याय भवन बीड येथे जन आरोग्य अभियान बीड जिल्हा समिती आणि कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने दि 13 ऑक्टोबर 2021  बुधवार रोजी आरोग्य हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी पॅनलिस्ट म्हणून  अनिकेतभैय्या लोहिया, सुनिलजी क्षीरसागर,  अॅड.हेमा पिंपळे, डाॅ.लहू योगे,भाऊसाहेब आहेर तर जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. जयवंत मोरे उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी आरोग्य यंत्रणेबद्दल अत्यंत गंभीर  मुद्दे मांडले.अनेक कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाल्या सभागृह हळहळले.यावेळी ठळकपणे पुढे आलेल्या मागण्या-अतिरिक्त बिलांचे ऑडिट करून परतावा लवकर मिळावा,सर्व रूग्णालयात रूग्ण हक्क सनद लावण्यात यावी,ऊसतोड कामगारांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा लागू करण्यात यावा,आयुर्मंगलम योजनेची पुन्हा रचना करावी,मासिक पाळीसंदर्भातील आजार आणि पॅपस्मेयर चाचणी शासकीय रुग्णालयाकडून करण्यात यावी,एकल महिलांना त्याच्या समंतीने गर्भपात करण्याची सुलभ सुविधा शासकीय रुग्णालयात मिळावी.एकल महिलांस mpjayआणिpmjayया योजनेत सरसकट समाविष्ट करण्यात यावे,रूग्णालयात प्रशिक्षित कर्मचारी असावेत, तसेच शासकीय रुग्णालयातील रिक्तपदांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया करण्यात यावी,रूग्णाच्या हितार्थ खाजगी रुग्णालयासाठी नियमन कायदा लवकरात लवकर अस्तित्वात आणावा,कोविड काळात कंत्राटी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन मिळावे व त्यांना शासकीय भरती मध्ये प्राधान्य द्यावे,उपकेंद्र स्तरावर अर्धवेळ कर्मचारी म्हणून पूर्णवेळ सेवा देणाऱ्या महिलांना निवृत्तीनंतर जिल्हा नियोजन विकास समिती मार्फत निवृत्ती वेतन देण्यात यावे अशा मागण्या उपस्थितांमधून करण्यात आल्या.आरोग्य हक्क जनसुनवाई मध्ये पिडीत महिला,एकल महिला,ऊसतोड कामगार महिला तसेच जनआरोग्य अभियानच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने डाॅ. जयवंत मोरे यांनी या सर्व मागण्यांबाबत आपण वरिष्ठ, जिल्हा व राज्य प्रशासनाकडे अहवाल सादर करू असे आश्वासन दिले.उपस्थित पॅनलिस्ट यांनी मागण्यांबाबत व आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर उपाय योजना करण्याच्या सुचना केल्या.या परिषदेचे सूत्रसंचालन कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे बाजीराव ढाकणे, मान्यवर मंडळींचा परिचय शुभांगी कुलकर्णी,आरोग्य हक्क परिषद प्रास्ताविक प्रल्हाद कुटे यांनी केले.ऊसतोड कामगार महिलांचे आरोग्य विषयक प्रश्न महिला किसान अधिकार मंच च्या कामिनी पवार यांनी मांडले.डाॅ.गडेकर यांनी शासकीय रुग्णालयातील रिक्तपदे  आणि रूग्णवाहिकाची स्थिती यावर प्रकाश टाकला.चित्रा पाटील यांनी शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आलेले मुद्दे सविस्तरपणे मांडले.या आरोग्य हक्क परिषदेसाठी उपस्थित मान्यवर ,सहभागी संस्था संघटना आणि सर्व कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांचे सहृदय आभार रुक्मिणी नागापूरे यांनी आयोजकांच्या वतीने जाहिर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा