Subscribe Us

header ads

कोरोना व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्या व ग्रामीण भागातील मानव विकास अंतर्गत बसेस तात्काळ सुरू करा---- डिगांबर शिराळे


अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा पोलीस मित्र युवा महासंघ तालुका अध्यक्ष डिगांबर शिराळे व पत्रकार यांचा  इशारा

किल्ले धारूर प्रतिनिधी_महाराष्ट्र शासनाने ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोरोना जागतिक महामारी व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांमुळे मोफत बसपास तात्काळ वाटप करा व  ८ वी   ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीसाठी मानव विकास योजनेअंतर्गत त्यांच्या घराच्या दारापासून ते शाळेपर्यंत मोफत बससेवा ही योजना गेल्या सात आठ वर्षांपासून चालू आहे, ती पुन्हा तात्काळ सुरू करावी अशी मागणी पोलीस मित्र युवा महासंघ तालुका अध्यक्ष ‌व डिगांबर शिराळे पत्रकार आहे. या योजनेअंतर्गत ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे हा उदात्त हेतू शासनाने ठेवलेला असून आता नुकताच राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे . तेव्हा या विद्यार्थिनीं शिक्षणापासून वंचित राहु नयेत  यासाठी मानव विकासच्या बसेस विनाविलंब सुरू करणे आवश्यक आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक व बौद्धिक नुकसान झालेले आहे. कोरोना महामारी मुळे अनेक शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरीब , सर्वसामान्य,  नोकरदार, मध्यमवर्गीय यांचा रोजगार व नोकरी गेली आहे यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणी सामना करावा लागत असून यामुळे यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षणाच्या वाढत चाललेल्या खासगीकरणामुळे शिक्षण महाग होत आहे व पालकांकडून पाल्यांना शिकवण  शक्य होत नाही. यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत आहेत. यामुळेच पोलीस मित्र युवा महासंघ तालुका अध्यक्ष डिगांबर शिराळे व पत्रकार यांनी मागणी करत आहे की विद्यार्थ्यांना सरसकट मोफत बसपास वाटप करा व तसेच मानव विकास अंतर्गत असलेल्या मुलींच्या स्वतंत्र बसेस तात्काळ सुरू करण्यात याव्यात, जर यावर तात्काळ अमलबजवणी झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा