Subscribe Us

header ads

मुंबईतील NCB अधिकाऱ्याला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक;परळीत गुन्हा दाखल

बीड_ट्रेनमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी परळी रेल्वे पोलिसांनी मुंबईच्या एनसीबी अधिकाऱ्याला अटक केली आहे. एनसीबीचे अधिकारी हैदराबादहून पुण्याला जात होते. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती औरंगाबादचे एस.पी. जीआरपी एम. पाटील यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ट्रेनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ती हैदराबाद-पुणे दरम्यान धावते. आरोपीविरोधात भादंवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश चव्हाण असे आरोपीचे नाव सांगितले जात आहे. ते नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी राहतात.ज्या डब्यात तो प्रवास करत होता त्यात २५ वर्षीय महिलाही प्रवास करत होती. महिलेने सांगितले की एनसीबी अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला. या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी मुंबईतल्या एनसीबी अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईत त्याचा कोणताही सहभाग नव्हता, असे एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा