(केज प्रतीनीधी) केज तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुहास हजारे साहेब पंचायत समिती गटविकास अधिकारी नागरगोजे साहेब दिव्यांगाचा 5% निधी आणि दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करुन पिवळ्या शिधा पत्रिका देण्यात याव्यात आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी केज तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुहास हजारे साहेब यांनी यादी करुण द्या पंधरा दिवसांत अंत्योदय योजने मध्ये दिव्यांगांना समाविष्ट करतो असे आश्वासन दिले तसेच पंचायत समिती सदस्य ठोंबरे साहेब यांनी पुढच्या मिटींग मध्ये 5% निधीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे माजलगाव तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण पदमीनी तारडे आगरकर शालीनी वायबसे ओम चाटे बिबीशन अंबाड काळे मुंडे यांच्यासह केज प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या