Subscribe Us

header ads

महाराष्ट्रात बहुजनांची अशी परवड का?भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा सवाल; महाविकास आघाडी सरकारवर साधला निशाणा

 बीड स्पीड न्यूज

औरंगाबाद_ महाराष्ट्रात ओबीसींची, बहुजनांची अशी परवड का? असा सवाल देखील त्यांनी महाविकासआघाडी सरकारला केला आहे. औरंगाबादमध्ये भाजपाच्या ओबीसी मेळाव्यात त्या बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या, बहुजन म्हणजे कोण? जो बहू आहे संख्यने तोज बहुजन ना? बहुजनाची व्याख्या काय? बहुजनाची व्याख्या मूळ अशीच आहे, जो बहुजन आहे तो बहू. जो जास्त संख्येने आहे तो बहुजन. मग कोण बहुजन आहे? ज्याला न्याय नाही मिळाला तो बहुजन आहे. ज्या नोकरी नाही मिळाली तो बहुजन आहे. ज्याला आरक्षण नाही मिळालं, ज्याला संरक्षण नाही मिळालं तो बहुजन आहे. आजही जातीपातीच्या नावावर गावांमध्ये लोकांवर अत्याचार होत आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिलांवर अत्याचार सुरू आहेत आणि आमच्या सारखे नेते ज्याच्यावर अत्याचार झाला आहे व ज्याने अत्याचार केला आहे, त्याची जात पाहून तिकडे भाषण करायला जातात. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हे महाराष्ट्राचं चित्र आता तरूण पिढीला पुढे आदर्श देण्यासारखं राहिलेलं नाही. हा आरक्षणाचा लढा कशासाठी आहे? हा आरक्षणाचा लढा जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी आहे. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही. जातीवादीसाठी जात नाही पण ताकद देण्यासाठी जात आहे.तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर १० टक्के आरक्षण दिलेलं आहे. ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी हे आरक्षण दिलं आहे. या देशामध्ये अनेक राज्ये आहेत ज्यांनी आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात, विधासभेत निर्णय घेतले आहेत व बहुजनांना न्याय दिलेला आहे. आज आपल्या राज्यात मी मंत्री होते तेव्हा, त्यावेळी ओबीसींचं ५० टक्के झालेले आरक्षण धोक्यात होतं, पण हे सरकार आल्यानंतर ५० टक्क्यांच्या खालचं सुद्धा आरक्षण संपुष्टात आलं आहे. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.याच बरोबर आता निवडणुका येणार आहेत, लोकांमध्ये नाराजी आहे, संताप आहे. लोक रस्त्यावर उतरत आहेत. भाजपाच नाही ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे. मग अशावेळी त्यांनी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. हा अध्यादेश अगोदर काढला असता तर, या ज्या निवडणुका आता लागल्या आहेत, त्यांना तो लागू झाला असता की नाही? या अध्यादेशावरून ओबीसीला कुठला धोका देण्याचं जर तुमचं षडयंत्र असेल तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. वंचितांना, पिडीतांना, सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आहे. ४२ वर्षांपासून आरक्षणासाठी लढा सुरू आहे. अजुनही समाजाला न्याय मिळत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. असा आरोप पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा