Subscribe Us

header ads

सतरा वर्षीय युवाकाची गळफास घेऊन आत्महत्या


केज_ केज तालुक्यातील देवगाव येथे एका १७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. ओमकार मल्हारी जावळे ( वय १७ ) असे त्याचे नाव असून मागील १५ वर्षांपूर्वी त्याच्या आई – वडिलांचे निधन झाल्याने ओमकार हा देवगाव येथील लक्ष्मण रामा कांबळे या मामाकडे होता. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता ओमकार याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत संजय मारुती कांबळे यांच्या गायरान जमिनीतील लिंबाच्या झाडास निदर्शनास आला. या घटनेनंतर नांदूरघाटचे बिट जमादार गोविंद बडे, पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. नांदूरघाटला मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. लक्ष्मण रामा कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून केज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा