Subscribe Us

header ads

बीडच्या सरकारी दवाखान्यात घडलेल्या त्या 307 च्या खटल्यातून फारूक पटेल यांच्यासह इतरांचे निर्दोष मुक्तता जिल्हा सत्र न्यायालयाचे महत्वपुर्ण निकाल, अ‍ॅड.अझहर अली यांनी मांडली होती बाजू

बीड स्पीड न्यूज 

बीड_ गेल्या अडीच वर्षापुर्वी शहरातील बीडच्या शासकीय जिल्हा रूग्णालयात एक घटना घडली होती या घटनेत बीड नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष तथा गट नेते फारूक पटेल त्यांचे भाऊ मुजाहेद पटेल , अशपाक इनामदार नवाज खान, आवेज इनामदार, अजजू खान सायद बबलू नदीम खान  यांच्यावर 307 व ईतर कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. गेले दोन वर्षापासून या खटल्याची सुनवाई बीडच्या जिल्हा न्यायालयात सुरू होती आज याचा निकाल न्यायाधिश मा.बागल साहेब यांच्या न्यायालयाने दिले आणि या खोटया गुन्हयातून फारूक पटेल सह त्या आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालाकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागून होते ऐन विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदर फारूक पटेलवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामुळे फारूक पटेल आणि अश्फाक इनामदार यांचा रमजान सारखा पवित्र महिना व सन जेलमध्ये गेला होता व त्यांच्या परिवाराला या गुन्हयामुळे नाहक त्रास सहन करावा लागले. इतकेच नव्हे तर फारुख पटेल यांना कोर्टाने चार्जशीट दाखल होईपर्यंत शहरांमध्ये येण्यास बंदी घातली होती व या सर्व आरोपींना आठवड्यातून दोनदा पोलीस स्टेशनची हजेरी लावण्यात आली होती आज या प्रकरणाचा निकाल आला आणि सर्व आठ ही जणांची निर्दोष मुक्तता झाल्याने फारूक पटेल यांच्या मित्र परिवाराने  समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणाची बाजू बीडचे प्रसिध्द विधिज्ञ अ‍ॅड.अजहर अली यांनी मांडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा