Subscribe Us

header ads

कुक्कडगाव, खंडोबा मंदिर शेजारी सिंदफना नदी पात्रातून रात्रंन दिवस अवैद्यरित्या वाळू उपसा चालुच. जिल्हाधिकारी साहेब लक्ष घाला!

बीड स्पीड न्यूज 

(बीड प्रतिनिधी) कुक्कडगाव,  खंडोबा मंदिर शेजारी, अनेक वेळा तक्रार देऊन ही मंडळ  अधिकारी ,तहसीलदार ,पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी, कोणतीही कारवाई करत नाहीत.अनेक वेळा मंडळ अधिकारी तहसीलदार, तलाटी, हे वाळूच्या साठ्या जवळ जाऊन पाहणी करतात पण कोणतीही कारवाई न करता तडजोड करून हे अधिकारी माघारी जातात?? आज ही शिंदफना नदी पात्रात वाळू उपसा केलेले साठे  दिसत आहे. आणि महसूल विभाग, तहसीलदार, मंडळ अधिकारी, यांना हे साठे कोणाचे आहेत हे माहीत आहे. परंतु अद्यापही कुठलीही कारवाई का होत नाही,?  मंडळ अधिकारी पोलीस प्रशासनाची या वाळू उपसा करण्यावर खुप कृपा आहे. असेच चित्र दिसत आहे. सर्व महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, आणि पोलीस प्रशासन, हे  फक्त बघायची भूमिका घेत आहे. मग या 

वाळू माफियांच्या विरोधात कारवाई कोण करणार आहे.?? मंडळ अधिकारी. तहसीलदार महसूल विभाग. पोलीस प्रशासन हे वाळू माफियांचा पाठराखण करण्यासाठीं आहे का.? या सर्व अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणाने  वाळू माफिया विना रॉयल्टी पावतीची 
बिनधास्तपणे वाळू उपसा करीत आहे.जर अवैध धंद्यांना साथ दिली जात असेल तर कायदा सुव्यवस्थेला मुठ माती द्यायला वेळ लागणार नाही! येनकेन प्रकारे या वाळू माफियांची चलती चालू आहे.  त्याबद्दल कुणाची ओरडा असण्याची काहीच गरज नाही! मात्र अवैध होणारी वाहतूक, अवैध होणारी साठेबाजी आणि त्यामुळे 

प्रशासनाची होणारी लूट! याला जबाबदार कोण?? हा मोठा प्रश्न जनसामान्य समोर पडलेला आहे. हा प्रश्न कोण सोडवणार? कारण सर्वच यासंदर्भात मळून आहेत  की काय? असे वाटू लागले आहे.  कारण कित्येक तक्रारी आल्या कित्येकांनी निवेदने दिली.  मात्र कुणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही!! जो कोणी आवाज उठवेल त्याचा आवाज दाबायला वाळू माफिया सज्ज आहे.  हा सर्व प्रकार पाहिल्यास महसूल प्रशासनाचे पुढे आणि राजकारणातील भ्रष्ट व्यक्तीच्या पुढे गोरगरिबांचे काही चालत नाही. आता याप्रकरणी जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालावे अशी मागणी कुक्कडगाव चे लोक बोलून दाखवित आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा