Subscribe Us

header ads

कुर्‍हाडीने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला 5 वर्षाची सक्तमजुरी व 5 हजाराचा दंड

बीड स्पीड न्यूज 

बीड दि.30 (प्रतिनिधी) कुर्‍हाडीने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍ंंया आरोपीना 5 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर.ए. वाघमारे यांनी काम पाहिले.यासंदर्भात माहिती अशी की, दिनांक 12 सप्टेंबर 2017 रोजी आरोपी सुरेश उर्फ नवनाथ वाघमारे रा.निपाणी टाकळी ता. माजलगाव याने पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादीस, तू लई माजलास, असे म्हणून डोक्यात कुर्‍हाडीने मारून जीवे मारण्याचा गंभीर प्रयत्न केला. इत्तर दोघांंनी शिवीगाळ करून मारहाण केली. सदर फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 307, 504, 506 34 अन्वये गुन्हा र.नं. 269/2017 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ नरके यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात 9 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जखमी नारायण ज्ञानोबा वाघमारे, इत्तर साक्षीदार आणि तपासी अधिकारी यांच्या महत्वपूर्ण साक्षी ग्राह्य धरण्यात आल्या. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला 5वर्षाची सक्त मजुरी आणि 5 हजार रूपयाचा दंड व दंड न भरल्यास 2 महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच इत्तर दोघा आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले.अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर.ए. वाघमारे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील एन.एस. पाटील, पी.एन. मस्कर व ए.एस. तांदळे यांनी सहाय्य केले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉ. जालींदर बावळकर यांनी व फिर्यादीचे वकील एल.बी. गवते यांनी साक्षीदार हजर ठेवून विशेष सहकार्य केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा