Subscribe Us

header ads

बार्शी नाक्यावरील बायोडिझेल पंपावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बीड स्पीड न्यूज 

बीड_ बार्शी नाक्या जवळ भारत पेट्रोल पंपासमोर बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत जवळपास बायोडिझेल, तीन वाहनांसह जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोन जणां विरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.बार्शी नाक्यावरील भारत पेट्रोल पंपाच्या समोर बायोडिझेलची विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत बायोडिझेल विक्री होत असलेल्या ठिकाणी छापा मारला. सोबतच या कारवाईची माहिती पुरवठा 

विभागाला देण्यात आली.त्यावरून नायब तहसीलदार शिरसाट, मंडळाधिकारी सानप, जहीर शेख यांनी घटना स्थानी भेट दिली. या झालेल्या कारवाईत तीन ते साडेतीन हजार लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले. तसेच तीन पिकअप वाहनासह जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय कोकलारे, एएसआय खेडकर,हे.काॅ. शेख नसीर, रामदास तांदळे प्रसाद कदम अशोक दुबाले अतुल हराळे सहभागी झाले होते.यावेळी शेख नईम रहीम,शेख फयाज या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा