Subscribe Us

header ads

ई श्रम कार्ड कामगारांसाठी सुरक्षा कवच -- स्वप्निल गलधर;500 असंघटीत कामगारांना एमएस कंट्रक्शनकडून मोफत ई श्रम कार्ड वाटप

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागळातील सर्व सामान्यांचा विचार करुन देशात अनेक योजना लागु केलेल्या आहेत. यात ई श्रम कार्ड योजना ही असंघटीत कामगारांनासाठी सुरक्षा कवच ठरत असल्याचे मत युवा नेते स्वप्निल गलधर यांनी रविवारी (ता. 21) पार पाडलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.एमएस कंट्रक्शनचे मालक साथीराम ढोले यांच्या वतिने रविवारी (ता. 21) शहरातील बाजीराव जगताप कॉप्लेक्स याठिकाणी असंघटीत कामगारांसाठी मोफत ई कार्ड वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना स्वप्निल गलधर म्हणाले की, केंद्र सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांचा लाभ कोरोनाच्या काळात अनेक गरिबांना झाला आहे. यामुळे भविष्यात सुद्धा या योजना सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. याच अनुषंगाने सर्व संघटीत कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते स्वप्निल गलधर यांनी केले. तसेच यावेळी बोलताना प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे म्हणाले की, शासनाच्या अनेक योजना असतात, परंतु त्या योजनेचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती अनेकांना नसते. याच अनुषंगाने साथीराम ढोले यांनी पुढाकार घेऊन ई श्रम कार्ड वाटपाचे आयोजन केले असून त्यांच्या या उपक्रमाचा अनेकांना फायदा होईल. या उपक्रमाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी संपादक जालिंदर धांडे यांनी केले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक संजय मोटे,कैलास तांडे, बाळासाहेब कदम, प्रविण पालीमकर,  राजकुमार ढोले,दत्ता गलधर  नगरसेवक लक्ष्मण विटकर, माजी सरपंच आप्पा कदम, सचिन,कल्याण ढोले  तेलप, अनिल जाधव, अशोक जगताप, नामदेव ढोले, अभिषेक सगळे, भरत वाणी, सागर गलधर, सतिष गलधर, जयदिप ढोले, सोनु ढोले यांच्यासह बांधकाम कामगारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवा नेते अशोक ढोले यांनी केले.

साथीराम ढोले यांच्यामुळे 500 जणांना मिळाला आधार

शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा शासकिय कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात. असंघटीत कामगारांना वेळेत व एकाच ठिकाणी ई श्रम कार्ड मिळावे यासाठी एमएस कंट्रक्शनचे मालक साथीराम ढोले यांनी पुढाकर घेतला. त्यांच्या मुळे येथील 500 जणांना ई श्रम कार्ड मिळाले असून त्यांचा त्यांना मोठा फायदा झाला आहे. कार्ड मिळालेल्या कामगारांनी ढोले यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा