बीड स्पीड न्यूज
बीड प्रतिनिधी/दि.२१बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चर्हाटा फाटा ते नवगण राजुरीपर्यंत नगर रोडवर मोठ मोठे खड्डे पडले होते शहरातील वाहन धारकांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.बीड नगर रोड रस्ता पूर्ण पणे खराब झाला होता काही दिवसा पूर्वी याच नगर रोड वरती अनेक अपघात या खड्या मुळे झाले अनेक लोकांचे मणके या खड्या मुळे मोडले तेव्हा कुठे थातुरमातुर खड्डे बुजवले पण दुर्देयवाने हे खड्डे दोन महिने हि टिकले नाही आजही या खड्ड्यांमुळे रोज अपघात
गोष्टीला जनता कंटाळली होती, रोजचा प्रवास आणि खराब रस्ता हा धोके - दायक दिसत असल्याने नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या मुळे शहरातील नागरिक खुप परेशान झाले होते. प्रशासनाचे व आमदारांचे या रस्त्याकडे का दुर्लक्ष होत होते? असे अनेक प्रशन जनतेतुन बोलले जात होते. बीडला जाणे म्हणजे जिवावर उदार होऊन जावे लागत होते. तरी शासनाने लवकरात लवकर उपाय योजना
कराव्यात. अशी मागणी करून देखील रोड वरचे खड्डे बुजवण्याचे काम होत नव्हते याची दखल घेत बीड स्पीड ने १९ नोव्हेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. लगेच बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने दाखल घेत दोन दिवसातच नगर रोड येथील खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे बीड स्पीड च्या दणक्याने काम सुरु झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या