Subscribe Us

header ads

स्वराज्य नगर मधील नागरिक भारतीय नाहीत का?? ---- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

जनप्रतिनिधी नागरिकांना म्हणतात, तुमचे मतदान नगरपालिकेत नाही म्हणून आम्ही तुमचे काम करणार नाही

बीड प्रतिनिधी_बीड शहरातील स्वराज्य नगर भागामध्ये आम आदमी पार्टीच्या संवाद यात्रेमध्ये नागरिकांशी संवाद करण्यात आला व येथील समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांशी बोलत असताना येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला की ज्यावेळेस आम्ही येथील नगरसेवक नगराध्यक्ष किंवा जनप्रतिनिधी यांना विचारणा केली असता ते आम्हाला सांगतात तुमचे मतदान या ठिकाणी नाही म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या भागाचा विकास करणार नाही तुमचे मतदान आम्हाला नाही आम्ही तुमचे काम करणार नाही येथील नगरपालिका नागरिकांना एवढे वेठीस धरण्याचे काम का करत आहे जर हि नगरपालिका इथे काम करणार नसतील तर नगरपालिकेला येथील नागरिकांचा टेक्स का वसूल करते हा मोठा गंभीर प्रश्न आहे या भागांमध्ये मागील तीस ते चाळीस वर्षापासून लोकं राहतात त्या भागामध्ये नाल्या नाहीत रस्ते नाहीत 

फुटलेल्या नळाच्या पाइपलाइन आहेत त्या दुरुस्त होत नाहीत ज्या नाल्या बनलेल्या आहेत त्याची साफसफाई होत नाही घंटागाड्या येत नाही विशेष म्हणजे या भागांमधील सर्व टॅक्स भरणारे लोक असून सुद्धा या भागातील सर्व लाईट पथदिवे कट करण्यात आलेले आहेत तरी नगरपालिका याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही मा. आदरणीय नगराध्यक्ष साहेब नुसते गुत्तेदार पोहोचण्यासाठी उद्घाटन करण्यातचं व्यस्त आहेत परंतु या बीड शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी हे बिलकुल नाकारते झालेले आहेत अपयशी ठरलेले आहेत असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे या सर्व नागरिकांना सोबत घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या काही काळामध्ये सर्व जनतेला जागृत करण्याचे काम करत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सत्ताधाऱ्यांना येथील नागरिक विचारणा केल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच संवाद दौर्‍यामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर प्रमुख सय्यद सादेक सचिव रामधन जमाले प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटनमंत्री रामभाऊ शेरकर कैलास चंद पालीवाल बाळासाहेब घुमरे अक्रम शेख व तेथील समस्त नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा