Subscribe Us

header ads

जिल्हाध्यक्ष सुरेश पवारांच्या वाढदिवसानिमित्त 51 जणांनी केले रक्तदान; राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने आयोजित केलेले सिव्हीमधील रक्तदान शिबीर सपन्न

बीड स्पीड न्यूज 

बीड,दि.17 ( प्रतिनिधी)ः- कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासली होती. पुढेही तिसरी लाट येणार आसल्याचे सांगितले जात असल्याने त्या काळात तरी टंचाई भासू नये यासाठी आपणही काही तरी केले पाहिजे या हेतूने कायम समाज सेवेत व रुग्णसेवेत असलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या रक्तदार शिबीरामध्ये 51 तरूणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण सर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, रक्तपेढी प्रमुख डॉ.जयश्री बांगर, डॉ.प्रविण देशमुख, भाजप नेते सर्जेराव तांदळे, दिलीप अण्णा गोरे, नगरसेवक जगदिश गुरखुदे, विक्रांत हजारी, परशुराम गुरखुदे, अ‍ॅड.संगिता धसे, विक्रम पवार, परमेश्‍वर गोंडे यांच्यासह आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे तरूणांनी प्रत्येक तीन महिन्याला किंवा वेळ भेटेल तेव्हा रक्तपेढीत येवून रक्तदान करावे. असे आवाहन यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी केले. तर सुरेश पवारांची समाज सेवा म्हणून कायम पहाता. रुग्णांबाबत असलेली तळमळ तसेच जनसामान्यांसाठी अहोरात्र करत असलेल्या सेवेमुळेच त्याच्याकडे मागित दोन दिवसापुर्वी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाची धुरा संभाळण्याचे पद दिले आहे. त्याच्यासेवेला येथील अधिकारी व कर्मचारी साथ कायम राहू द्या असे मत यावेळी महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण सर यांनी मत व्यक्त करत असतांना मांडले. राष्ट्रीय बंजारा परिषदेने आयोजित केलेले रक्तदान शिबीर उत्साहात सपन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा