Subscribe Us

header ads

बालेपीर भागातील चोरीप्रकरणात आरोपीला अटक

बीड स्पीड न्यूज 

बीड दि.१७ _ शहरातील बालेपीर भागामध्ये परवा दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलीसांनी छडा लावला असून एका आरोपीला अटक केली.यावेळी तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शेख रजिया जिलानी रा.बालेपीर या बाहेर गेल्याने याच संधीचा फायदा उचलून चोरट्याने त्यांच्या घरात चोरी केली होती. यामध्ये सोन्याच्या दागीन्यासह नगदी रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी शेख रजिया यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी चोरी प्रकरणातील आरोपी शेख जिशान शेख रियाज (वय-१९ वर्ष) रा.नुरानी मस्जीद जवळ अमराई बालेपीर) असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. याच्याकडून काही मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिआय साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय शेजुळ,पिएसआय दराडे, पोलीस नाईक शेख, चव्हाण, काळे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा