Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडी च्या आजच्या मोर्चात सहभागी व्हावे--प्रेम जगतकर.

बीड स्पीड न्यूज 


वंचित बहुजन आघाडी च्या आजच्या मोर्चात सहभागी व्हावे--प्रेम जगतकर.   

परळी | प्रतिनिधी-: वंचित बहुजन आघाडी च्या आजच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील मोहमदिया काॅलनी येथील रोड नाल्या व लाईटची व्यवस्था करण्यात यावी यासह परळी शहरातील नागसेन नगर भिमानगर येथे हि रोड नाल्या सह नागरी सुविधा करण्यात याव्यात तसेच परळी शहरातील दलितांच्या स्मशानभूमीवर अनाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून कामे करण्यात आली परंतु अर्धवट राहिलेले काम उदा लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्या साठी आज परळी नगर पालिकेवर जवाब दो आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफारश्या खान यांच्या नियोजना खालिल मोर्चात वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सामील व्हावे.असे आव्हान वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा