Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. एम.ए.वहीद (न्यूरो फिजिशियन) यांचा मोमीन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भव्य सत्कार

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. एम.ए.वहीद (न्यूरो फिजिशियन) यांचा मोमीन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भव्य सत्कार 




बीड (प्रतिनिधी) - शहराचे भूमिपुत्र तथा औरंगाबाद शहरातील एशियन हॉस्पिटलचे डॉ. एम.ए.वहीद न्यूरो फिजिशियन यांचा मोमीन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शासकीय विश्रामगृहात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉ. एम.ए.वहीद यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड शहरातील चंपावती विद्यालयात पूर्ण केले तर उच्च माध्यमिक शिक्षण बलभीम महाविद्यालयात घेतले. शिक्षणात हुशार असल्याने नेहमी ते विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले नंतर त्यांनी शासकीय कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आणि आज ते एक सुविख्यात न्यूरो फिजिशियन म्हणून फक्त आपल्या बीड व औरंगाबाद जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात सुपरिचीत आहेत. नुकतेच त्यांनी बीड शहरातील विवेकानंद हॉस्पिटल व अपेक्स चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये महिन्यातून दोन वेळेस भेट देऊन रुग्णांची तपासणी करण्याचे कार्य हाती घेतले आहे. आता ते नियमितपणे रुग्ण तपासणीसाठी येणार आहेत. यामुळे आता बीड जिल्ह्यातील मेंदू विकार रुग्णांना तपासणीसाठी  होणारी अडचण दूर झाली आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेत मोमीन चॅरिटेबल ट्रस्ट बीड कडून त्यांना राज्यस्तरीय भारतरत्न राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार, प्रमाणपत्र व पेढे देऊन सन्मानित करण्यात आले. हा सत्कार समारंभ मोमीन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. वाजेद मोमीन, नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्दिकी नवीद, ॲक्सिस हॉस्पिटल बीड चे डॉ. सय्यद अब्दुल हसीब (अस्थिरोगतज्ञ), अब्दुल खालेख (अपेक्स हॉस्पिटल बीड), मोहम्मद अब्दुल शाँफे (शाफे मेडिकल) या सर्वांच्या सहकार्याने हा भव्य सत्कार समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमात एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ, अब्दुस् सलाम सेठ, शम्स्उद्दीन देवलेकर, सादेक अंबानी, मुज्तबा अहेमद खान, पाशा भाई, मन्नान भाई, इम्रान सर (मु.अ.अल् फारूक शाळा बीड), फारूक सर, रफीक कुरेशी यांच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मोमीन चॅरिटेबल ट्रस्ट बीडचे अध्यक्ष ॲड. मोमीन वाजेद व मार्गदर्शक प्राचार्य सिद्दीकी नवीद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा